माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
निसर्गाचे समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावण्याचे दिले संदेश!
आलापल्ली (सेवा पवार)
येथील वन विभागाच्या वतीने 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मिशन अंतर्गत पटेल वार्ड लगतच्या वन विभागाच्या कक्ष क्रमांक 42 मधील जागेवर शनिवार 20 जुलै रोजी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री ताई आत्राम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपन कार्यक्रमात आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक सर्वेशकुमार सावरडेकर, सहाय्यक उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, सहाय्यक उपवनसंरक्षक प्रविणकुमार बोधनवार, उपसरपंच पुष्पाताई अलोने,प्राचार्य गजानन लोनबले, ग्रा.पं.सदस्य कैलास कोरेत, सुरेंद्र अलोने, लक्ष्मण येरावार, आशिष झाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी, दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत असून यात आपलीच चूक असल्याने निसर्ग चक्र बद्दलत आहे, योग्य वेळी वारा, पाऊस येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे व पर्यायाने मनुष्याचे पावसाअभावी बेहाल होत आहे हे टिकविण्यासाठी केवळ झाडे लावूनच नाही तर लावलेल्या झाडांचे संगोपन आणि टिकविणे गरजेचे असल्याचे म्हणत,निसर्गाचे समतोल राखण्यासाठी प्रत्येकांनी किमान एक झाड तरी लावन्याचा संदेश देऊन पुढे, झाडांमुळेच स्वच्छ हवा, ऑक्सिजन आणि प्राणवायू मिळते त्यामुळे मनुष्य आणि सृष्टी टिकून राहते अशाप्रकारे झाडांचे महत्त्व पटवून धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्या नंतर माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम, सभापती भाग्यश्री ताई आत्राम, उप वनसंरक्षक तांबे, सावरडेकर, नितेश देवगडे, बोधनवार, पुष्पाताई अलोने, कैलास कोरेत, लोनबले आदी मान्यवरांच्या शुभहस्ते विविध प्रजातीचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात अल्ताप पठाण, पराग पांढरे, सुधाकर पेद्दीवार,साक्षी मलेलवार, मंगला गेडाम, महेश येरावार, नागेश करमे आदी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी वन विभागाचे योगेश शेरेकर,विनोद शिंदे,शंकर गुरूनुले,देवकाते, प्रदीप गेडाम चंदु सडमेक, जामबुळे, श्रीरामे,चाटे,मातने,चिव्हाणे वंदना मडावी, नरेश मेश्राम, नाना सोयायआदी कर्मचारी आणि राणी दुर्गावती शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!