अखेर कोटा पोचमपल्ली येथील मिनरल वॉटर फिल्टर प्लांटचे लोकार्पण सोहळा संपन्न

 जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनागम यांच्या हस्ते मिनरल वॉटर फिल्टर प्लांटचे लोकार्पण

    कोटा पोचमपल्ली येथील गावकऱ्यांना आता  मिळणार एका रुपयात  घागरभर मिनरल पाणी*


सिरोंचा (सेवा पवार)सिरोंचा तालुक्यातील कोटा पोचमपल्ली येथे जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम यांच्या हस्ते मिनरल वॉटर प्लांट चे लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
      जिल्हा परिषदेचे सभापती जनागम यांच्या माहेर गाव असलेल्या कोटा पोचमपल्ली गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासुन प्लॉराईड युक्त पिण्याचे पाणी पिऊन अनेक नागरिक बिमार पडत होते.गावकऱ्यांच्या या गंभीर समस्यांवर दखल घेत जिल्हा परिषद सभापतींनी गावातील नागरिकांची आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा परिषद सभेत सभापतींनी विषय मांडून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा कडून प्लॉराईड युक्त पाणी पूर्वठासाठी 28 लक्ष रु निधी मागील सहा महिन्यांपूर्वी  मंजूर करवून घेतल्या.
     कोटा पोचमपल्ली येथील मिनरल वॉटर  फिल्टर  प्लांट चे काम पूर्ण झाल्याने या प्लांटचे लोकार्पण आज  मोठया थाटात पार पडला.
     या शुभकार्यक्रम प्रसंगी गावातील आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, सरपंच विजया वेंकटी आसाम, संतोष पडाला , गणेश बचलकुरा,बोल्ले शंकर,समय्या मारबाईना, लिंगय्या एलकुची, तिरुपती मारबाईना, डोंगरे पेदाराजम,बक्कय्या कोरते, येमा समय्या ,तलांडी मोंडी, सल्ला शेखर,सल्ला शेखर सुदर्शन गोमासी,वेंकटी दासरी,मधुकर बुरम,लक्ष्मण बोल्ले सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!