गोपनीय माहितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सापळा रचून पकडली ९६ हजार रुपयांची अवैध देशी दारू
गोपनीय माहितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी सापळा रचून पकडली ९६ हजार रुपयांची अवैध देशी दारू
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक. ०१ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्हा दारू बंदी झाली असून दैनंदिन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू साठा नाका बंदी असतांना व पेट्रोलिंग सुरू असतांना पास होतोच कसा ? समोर येत असून यात " दोषी "अवैध दारू विक्रेत्यास म्हणावे कि या अवैध व्यवसायास चालना देणाऱ्या यंत्रणेला ? कि दारू बंदी फसवी ठरली असे संबोधावे . स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक , तसेच उत्पादन शुल्क विभाग यात दोषी काय ? यातीलच हा प्रकार असावा काय ? दिनांक.१५/०७/२०१९ ला रात्रो दरम्यान चिमूर वरून १३ कि.मी.अंतरावर असलेल्या मजरा या गावातील आरोपी नामे सुभाष राजाराम रणदिवे यांच्या राहत्या घरी दारूबंदी बाबत प्रोव्ही. रेड केली असता झडती दरम्यान ९६० नग प्रत्येकी १८० मि.ली.च्या ( २० पेट्या ) देशी दारूच्या निपा किंमत ९६००० रु. च्या मिळून आल्या सदर गुन्ह्यातील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. सदर कारवाई उप.विभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले , पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वाखाली नापोशि किशोर बोढे , पोशी दगडु सरवदे, देविदास रणदिवे, भरत घोळवे, विजय उपरे यांनी पार हि कारवाही पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!