मूलच्या नवभारत केंद्रावर जीसीसी-टीबीटी परीक्षेत गैरप्रकार

मूलच्या नवभारत केंद्रावर  जीसीसी-टीबीटी परीक्षेत गैरप्रकार

चंद्रपूर/प्रतिनिधी 
gcc-tbc परीक्षेत नवभारत विद्यालय मूल केंद्र क्रमांक 7507 येथे गैरपरकार होत असल्याची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकङे करण्यात आली आहे. 

 मूल येथील नवभारत विद्यालयात gcc-tbc परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रावर शिरीष खोब्रागडे हे आयटी टीचर आहेत. ते नवभारत विद्यालयात कोणत्याही प्रकारच्या सेवेत नाहीत आणि त्यांचे संबंध बाहेरील gcc-tbc प्रशिक्षण चालविणाऱ्या इन्स्टिट्यूट सोबत आहे.  दिनांक 17 7 2019 रोजी बॅच क्रमांक 101, 102, 103  मध्ये काही विद्यार्थी हे कॉम्प्युटर समोर नाममात्र असलेले दिसून आले. ते कोणत्याही प्रकारची परीक्षा देत नव्हते. माहिती काढली असता त्यांचा अॅक्सेस बाहेरील  इन्स्टिट्यूट मधील कम्प्युटरला देऊन तिथून परीक्षा दुसरी व्यक्ती परिक्षा देत असल्याचे आढळून आले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे आपण याची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या नियमानुसार आयटी टीचर हा संस्थेचा कर्मचारी असावा मात्र नवभारत विद्यालयात आयटी टीचर उपलब्ध असतानाही बाहेरच्या व्यक्तीला तंत्रस्नेही दाखवून त्यांना आयडी टीचर म्हणून या परीक्षेत नेमणूक केली हे उल्लेखनीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!