माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भेट!

माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भेट!
 ग्रामीण व दुर्गम भागात सातत्याने करीत आहेत दौरे!!


अहेरी (सेमा पवार)
     अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आज मंगळवार 16 जुलै रोजी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन रुग्णालतातील रुग्णांशी आस्थेने विचारपूस केले आणि तदनंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी यांच्याशी हितगुज व चर्चा केले.
     माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम कोणत्याही पदावर नसले तरी पदाची पर्वा न करता गोर गरीब व सर्वसामान्यांसाठी सदैव धावून जात असल्याने आणि अकस्मात अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात भेट दिल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
     विशेष म्हणजे अहेरी उपजिल्हातील ग्रामीण व  दुर्गम भागात  सातत्याने व अविश्रांत दौरे करून समस्या जाणून घेत आहेत व ते समस्या तात्काळ सोडविण्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!