“वन्यप्राण्यांमुळे होणारी पिकनुकसान भरपाई वाढवून द्या, अन्यथा शेती मक्ता स्वरुपात घ्या
“वन्यप्राण्यांमुळे होणारी पिकनुकसान भरपाई वाढवून द्या, अन्यथा शेती मक्ता स्वरुपात घ्या”
मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांची वनमंत्र्यांना मागणी.
शुभम बारसागडे/नेरी(चिमूर):
चंद्रपूर जिल्ह्यातील जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्रप्रकल्प जगप्रसिद्ध आहे. तसेच इथे सर्व वन्यप्राण्यांचा सहवास आहे. सोबतच जंगला जवळ असलेल्या जागेवर शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु अल्प पावसामुळे शेतकरी हवाल दिल झाले असताना दुसरी कडे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगत सोयाबीन व कापसाची शेती करणारा शेतकरी वन्यप्राण्यांमुळे त्रस्त आहे. शेतीतल्या उभ्या पिकाची नासाडी जंगली जनावर करून जात आहे, व वनविभागाकडून मिळणारी पिक नुकसान भरपाई अत्यल्प स्वरुपाची असल्याने शेतकऱ्यांपुढे पुढील आयुष्य जगायचे कसे हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर मिळणारी भरपाई अत्यल्प स्वरुपाची असून ती कधी सहा महिन्याने तर कधी वर्षभराने मिळत असल्याने दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व हि नुकसान भरपाई शासन निर्णयानुसार कमाल २५००० मर्यादा असून यापेक्षा नुकसानभरपाई झालेल्या पिकाच्या नुकसानप्रमाणे देण्यात यावी, तसेच वनविभागातर्फे शेतकऱ्यांना कुंपणाची व्यवस्था करून द्यावी व ह्या सर्व मागण्या शक्य नसल्यास वनविभागाने शेती मक्ता स्वरुपात घ्यावी व हेक्टरी ३५००० रुपये वर्षाला शेतकऱ्याला द्यावे यासाठी वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चिमूर विभागातील बाधित शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षकांना आपल्या व्यथा सांगितल्यावर ताबडतोब पंचनामे करून प्रलंबित प्रकरण त्वरित पूर्ण करून योग्य ती मदत दोन दिवसात पुरविण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदर निवेदन चिमूर विधानसभेचे मनसे जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात देण्यात आले व मागण्या मान्य न झाल्यास येत्या सात दिवसात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला. यावेळी मनविसेचे जिल्हाअध्यक्ष राहुल बालमवार, मनसे तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शिरीष माणेकर, तसेच शेतकरी प्रविण घुगरे बोथली, योगेश चामचोर, पुंडलिक निशाने, रूपेश चौधरी , बेबीबाई घुगरे, हरीदासजी नन्नावरे, रोषण गुडधे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!