कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांचे अपात्र ठरविण्याचे अर्ज खारीज

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण मालू व निरज गोठी यांना अपात्र घोषित करण्यासाठी दाखल केलेले अर्ज जिल्हा उपनिबंधक यांनी खारीजकेले आहेसंबंधित संचालकांकडे वैयक्तिकरीत्या बाजार समितीची कोणतीही थकबाकी येणे नसल्याचा निष्कर्ष नोंदवित जिल्हा उपनिबंधक ठाकूर यांनी  आदेश पारित केला. त्यामुळे दोन्ही संचालकांचे पद कायम राहिले आहे. या दोन्ही संचालकांविरुद्ध डॉ. विजय देवतळे यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.

प्रवीण मालू यांच्या विरोधातील तक्रारीत त्यांच्या पत्नी च्या मालकीच्या मे. कुशल दाल उद्योग या फर्मकडे सन २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षांची बाष्पी समारे ३ लाख ३७ हजार ७५१ रुपयांची देखरेख फी थकीत असल्याचा आरोप करीत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान सादर झालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित आर्थिक वर्षात प्रवीण मालू हे मे. कुशल दाल उद्योगाचे भागीदार नसल्याचे तसेच ही फर्म त्यांच्या पत्नी  च्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच फर्मकडेही बाजार फी किंवा शुल्काची थकबाकी येत नसल्याचा निष्कर्ष नोंदविल्याने त्यांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज फेटाळला.

तर, निरज गोठी यांच्या विरोधातील तक्रारीत गोठी यांच्या वैयक्तिक फर्मकडे तसेच त्यांच्या पत्नी भागीदार असलेल्या मे. बालाजी अग्रो इंडस्ट्रीज या फर्मकडे बाजार फी आणि देखरेख फीची थकबाकी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात बाजार समितीचे सचिव चंद्रषेन शिंदे यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यानुसार निरज गोठी यांच्या वैयक्तिक फर्मकडे देखरेख फीची कोणतीही थकबाकी नव्हती. मात्र, ज्योती निरज गोठी भागीदार असलेल्या मे. बालाजी अग्रो इंडस्ट्रीजकडे सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीतील ३५ लाख ८० हजार ५९६ रुपये देखरेख फी थकीत असल्याचे ताळेबंदात निदर्शनास आले. या बाबींचा विचार करून जिल्हा उपनिबंधकांनी निरज गोठी यांच्याकडे वैयक्तिकरीत्या बाजार समितीची कोणतीही येणे नसल्याचे स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!