शेगाव बु येथे दिवाळीनिमित्त गरजूंना शिधा वाटप
मुकेशभाऊ जिवतोडे यांचा सामाजिक उपक्रम
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव बु. येथे दिवाळी सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, या सामाजिक भावनेतून शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे पक्ष) दुष्काळग्रस्त भाग आणि गरजू कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा किट्सचे वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आणि स्वखर्चातून हा आनंदाचा शिधा व मदत पोहोचवली जात असून वरोरा-भद्रावती विधानसभा संघटक मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डा शेगाव क्षेत्रातील ओकार लोडे,रवी वाटकर,अक्षय बोंदगुलवार, अमोल दातारकर,आकाश नाकाडे, प्रफुल वाढई इत्यादी कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने शेगाव बु. येथे गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त दिवाळीचा शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत गावातील गरजू, अनाथ तसेच विधवा महिला, कामगार लाभार्थ्यांना शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सण आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून गरजूंच्या मदतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!