नव्याने पदभार सांभाळलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाची धडाकेबाज कारवाई

शेगाव पोलीस स्टेशनचा कार्यभार पहिल्यांदा महिला पोलीस ठाणेदार यांचे खांद्यावर

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत चिमूर तालुक्यातील जामनी (नवीन) येथे मागील कित्येक महिन्यापासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात महिला ठाणेदार निशा भुते यांनी धडाकेबाज कारवाई केलेली आहे..

हा जुगार अड्डा मागील कित्येक महिन्यापासून राजरोसपणे सुरू असून अद्यापही यावर कारवाई झालेली होती. मात्र शेगाव पोलीस स्टेशनचे नव्याने चार्ज घेतलेल्या लेडी सिंघम ठाणेदार भुते यांनी संबंधित जुगाड अड्ड्यावर धडाकेबाज कारवाई केलेली आहे यामध्ये तिघांना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून फक्त 1600  कॅश जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेला 52 पत्त्यांचा तास किंमत अंदाजे 30 रुपये व पाच मोटरसायकली किंमत अंदाजे दोन लाख 90 हजार असा एकूण 2.91630 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

जामणी गावातील तलावाजवळ तिरपाल टाकुन झोपडी तयार करून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शेगाव (बु.) पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तीन जण पोलिसांना पाहून फरार झाले. दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी शेगाव (बु.) पोलीस ठाण्याचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत  असताना पोलिसांना नविन जामणी तलावाजवळ काही जण तास पत्त्यावर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह जामणी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता तिरपाल च्या झोपडीत काही जण गोलाकार बसलेले दिसून आले.

पोलिसांनी अचानक धाड टाकली असता महेश गोमाजी आवारी (वय २८, रा. चिचघाट, ता. चिमूर), कैलाश वासुदेव आलाम (वय ४०, रा. जामणी) आणि गणेश आनंदराव पेंदाम (वय ३४, रा. जामणी) हे तिघे मिळून आले. तर अन्य तीन जण पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झाले. सूत्रांच्या माहितीनुसार हा जुगार भरवणारे सूत्रधार मात्र फरार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
कारवाई केली त्यावेळेस जुगार खेळणाऱ्या एकाही जवळ मोबाईल फोन नसल्याचे दिसून आले.

पोलिसांनी पंचांसमक्ष जप्तीची कारवाई केली असून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार स.पो. नि. निशा भुते यांचे मारगदर्शनात पी. एस. आई. सुमित कांबळे, मोहुरले व पो. ह. संतोष निषाद हे करीत आहे . 

गावामध्ये राजरोसपणे जुगार चालवण्याचा परवाना कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता हे मात्र अजुनही गुलदस्त्यात आहे.

विशेष म्हणजे शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 103 गावे   जोडली गेली असून या सर्व गावाची लोकसंख्या 87 हजार च्या जवळपास येत असुन यामध्ये शहर 11400, ग्रामीण 75600 लोकसंख्या आहे, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अवैध धंदे फोपावलेली असून नव्याने रुजू झालेल्या लेडीज सिंघम पोलीस ठाणेदार शेगाव बुजमध्ये व जवळपास असलेल्या परिसरात दारू, सट्टा, अवैध वाळू, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात  सुरू असल्यामुळे यावर सुद्धा महिला ठाणेदार योग्य कारवाईच्या बळगा उचलणार  का? असा प्रश्न परिसरातील नागरिकाकडुन  उपस्थित करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!