वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार - तीन महिन्यांत चार मनुष्य बळीने तालुका भयभीत



सावली - सामदा, व्याहाड बूज, सोनापूर, केरोडा, नीलसनी, पेठगाव यासह परिसरात वाघाने दहशत पसरवली असून सामदा बुज. येथील हेमंत अशोक भुरसे या गुराख्याचा वाघाने बळी घेतला असून तीन महिन्यांत चार नागरिकांना वेगवेगळ्य घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे.

       मागील २ जुलै रोजी सोनापूर येथील युवा शेतकरी अतुल गोहणे यांचा टस्कर हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी सामदा येथील गुराखी हिरामण साखरे याच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला. २६ ऑगस्ट रोजी केरोडा येथील नामदेव कुकडे याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. १२ सप्टेंबर रोजी व्याहाड बूज येथील शेतकरी अशोक ठाकरे यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले. १६ सप्टेंबर रोजी निलसनी येथील वासुदेव वाकुडकर याच्यावरही वाघाने हल्ला करून ठार केले. सततच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून शेतात गेलेला व्यक्ती परत येईपर्यंत कुटुंब चिंतेत राहत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतानाही नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात व वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!