श्री नाग गणेश मंडळ येथे आरोग्य शिबिर; १०८ नागरिकांची तपासणी
श्री नाग गणेश मंडळ येथे आरोग्य शिबिर; १०८ नागरिकांची तपासणी
मूल, दि. २१ सप्टेंबर २०२६ : शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र-१ (UHWC-1), वार्ड क्रमांक १३ अंतर्गत श्री नाग गणेश मंडळ येथे सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर UHWC-1 व HBT-AD यांच्या वतीने घेण्यात आले.
शिबिरात NCD (असंसर्गजन्य आजार), संसर्गजन्य आजार, ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाब (Hypertension) यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना आवश्यक उपचार व औषधांचे वितरण करण्यात आले.
या शिबिरात एकूण १०८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ५१ पुरुष आणि ४९ महिला असल्याची माहिती देण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या आरोग्यविषयक समस्यांनुसार संबंधितांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. निकिता जटाळे (MO-UHWC-1), डॉ. परिणिता सोनटक्के (MO-HBT), श्रवण गटलेवर (MPW-UHWC), मुन्ना उराडे (MPW-HBT), सचिन गावडे (परिचर-UHWC-1), शिवानी सताक (Lab Technician), अश्विनी दुम्मेवर व साहिल (सफाई कर्मचारी-UHWC), ललिता फुलझेले (वार्ड प्रमुख) यांच्यासह नगर परिषद कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शिबिर शांततेत व सुरळीतपणे पार पडले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!