धान उत्पादक शेतकऱ्यांचा नागभीड तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा



हजारोंच्या संख्येने शेतकरी 300च्या वर ट्रॅक्टर व दुचाकी वाहनासह  सहभागी; धान बोनस, २४ तास वीजपुरवठ्यासह विविध मागण्या 



तळोधी (बा.)-धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दि 17साई मंदिर तळोधी( बा )ते नागभीड तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. पाऊस येताना सुद्धा  शेतकरी बांधव यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात  शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेला धान बोनस तातडीने मिळावा, 24 तास सुरळीत वीज पुरवठा, सिंचनाच्या सुविधा, 4000 रुपये पर्यंत धानाला हमी भाव, नवीन विद्युत कनेक्शन, अशा प्रमुख मागण्याची मागणी करण्यात आली.बोनस रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन थकीत बोनसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर तहसीलदार  महेश देशमुख यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

धान उत्पादन शेतकऱ्यांचा मोर्चा  तळोधी बा येथील साई मंदिर देवस्थान पासून डॉक्टरांची रॅली काढून नागभीड येथील
  तहसील धडक मोर्चा काढण्यात आले. तहसील कार्यालयाच्या परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यानी एकमताने घोषणाबाजी देण्यात आली. शेतीसाठी २४ तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशीही जोरदार मागणी करण्यात आली. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत असून पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे मार्चात सांगितले.

शेतकऱ्यांना कृषी विद्युत कनेक्शन तातडीने उपलब्ध करून द्यावे, तसेच प्रलंबित वीज जोडण्या लवकरात लवकर मंजूर करून प्रत्यक्ष जोडणी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे, पंप व इतर कृषी साहित्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदन करण्यात आली. यावेळी निवेदन देतांना शेतकरी नेते प्रकाश पोहरे,नागभीड नगराध्यक्ष स्मिता खापर्डे,नयनाताई गेडाम, पद्माताई कांबळी, विनोद बोरकर, खोजराम मरसकोल्हे,धनंजय बोरकर, गिरीश नवघडे, श्रीकृष्णा गंजेवार, हितेश मुंगमोडे, दिवाकर कामडी, तुकाराम निकुरे, आतिष भाकरे, अमोल भाकरे, प्रमोद गायकवाड, रुपचंद झोडे, रमेश घुगुसकर असे हजारो लोक उपस्थित होते.

 विराट ऐतिहासिक मोर्चा 
नागभीड तालुक्यात पहिल्यांदा हजारोच्या संख्येत धान उत्पादक शेतकऱ्यांनी भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा तहसील कार्याल येथे शासनाविषयी घोषणाबाजी करण्यात आली.
नागभीड येथील राम मंदिर चौकातील रस्त्यावर धरणे देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बोनस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, अशी घोषणाबाजी करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!