शेगाव येथे सिमेंट काँक्रेट रोड लोकार्पण सोहळा संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसाचे अवचित्य साधून वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे जुना भागडे दवाखाना जवळ गावातील मुख्य सिमेंट काँक्रेट रस्ताचे लोकार्पण सोहळा आज सकाळी वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करणभाऊ संजयराव देवतळे यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला.

तालुक्यातील शेगाव बु.येथे सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर,प्रधानमंत्री खनिज विकास निधी 2025/26 अंतर्गत शेगाव  बु.येथील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे आमदार करणभाऊ देवतळे यांनी पुजन करून रिबीन कापून उद्घाटन केले असुन आमदार देवतळे यांचे व्यापारी लाईन, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून शाल तसेच श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आले.
या  कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते सुरज लोणकर,विपीन लोणकर,मानकर सर, राजुभाऊ बच्छुवार, ईश्वर नरड ,अजय लोडे, माजी जि. प.सदस्य कन्हैया जयस्वाल, डॉ. गंपावार, डॉ.घोडमारे,डॉ. बोंदुलवार,कोसुरकर सर,विनोद चिकटे,बंडुजी कोटकर, दिलीप बोंदूरवार, देवराव साखरकर, गोविंद कष्टी, मेसा उपसरपंच नीलकंठ वरभे, सुनील बोढे,श्रीकांत पेचे, अशोक बदकी,शंकर चौधरी, विजय नरड, मोरेश्वर नन्नावरे, गुणवंत लेडांगे, शरद कष्टी ,प्रकाश वाढई, श्रीधर नरड, राकेश पाटील, भूषण चापले, व्यापारी मंडळ शेगाव भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!