सावित्रीबाई फुले विद्यालयात एचआयव्ही, एड्स जनजागृतीपर व्याख्यानातून विद्यार्थ्यांचे संवेदीकरण

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : -  जिल्हा एड्स नियंत्रण पथक,शल्य चिकित्सक कार्यालय, भंडारा तसेच इंटेसिफाईड आयईसी कॅम्पेन-२०२६ अंतर्गत आयसीटीसीच्या माध्यमातून एचआयव्ही,एड्स,एसटीआय/आरटीआय या विषयांवर सावित्रीबाई फुले विद्यालय,पवनी येथे दि.१७ सप्टेंबर रोजी जनजागृतीपर व्याख्यान व संवेदीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या.प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामीण रुग्णालय, पवनी येथील आयसीटीसी विभागाच्या समुपदेशक माधुरी रामटेके तसेच आरोग्य सेवक मधुकर लेनघुरे उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी समुपदेशक माधुरी रामटेके यांनी किशोरवयीन मुला-मुलींना मैत्रीपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने १० ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना एचआयव्ही व एड्स,त्यावरील उपचार,संसर्गापासून बचाव तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक बाबींबाबत जागरुक राहून गैरसमज दूर करणे आणि योग्य माहिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे चांगल्या सवयी अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे,अरुणा कांबळे,अर्चना दडवे,स्मिता मोहरकर,प्रतीक रंगारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!