भोई समाज मच्छिमार सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - शेगाव येथून जवळच असलेल्या भोई समाज मच्छिमार सहकारी संस्था, चारगाव धरण, ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष दिनेश सदाशिव बावणे यांच्या अध्यक्षतेखाली वायगाव खडत येथे पार पडली.
या सभेमध्ये संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मासेमारीचे नियोजन, सभासद नोंदणी, तलावातील मासेमारीचे व्यवस्थापन, उत्पन्न-खर्च तसेच संस्थेच्या विविध आर्थिक व्यवहारांबाबत सभासदांसमोर माहिती मांडण्यात आली.
तसेच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण (ऑडिट), ऑडिट अहवालातील बाबी, संस्थेचे उत्पन्न व खर्च, शिल्लक रक्कम तसेच आर्थिक नोंदी व हिशोब व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेचा कारभार सहकार नियम, संस्थेचे उपविधी आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीने पारदर्शक पद्धतीने चालविण्याबाबत सभेत चर्चा झाली. सभेमध्ये संस्थेच्या पुढील वर्षातील आर्थिक नियोजनावरही विचारविनिमय करण्यात आला. संस्थेचे उत्पन्न वाढविणे, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे, उपलब्ध निधीचा योग्य वापर करणे आणि संस्थेच्या मालमत्ता व साधनसामग्रीची योग्य देखभाल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.याशिवाय संस्थेचे तलावतील मासेमारीचे नियोजन, सभासदांना रोजगाराच्या संधी, मासेमारीसाठी आवश्यक डोंगे, जाळी व इतर साहित्य उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध NFDP अंतर्गत मिळणाऱ्या योजना व अनुदानांचा लाभ संस्थेला मिळवून देणे तसेच मच्छिमार सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सर्व सभासदांनी एकत्रितपणे काम करून संस्थेचा कारभार अधिक सक्षम, पारदर्शक व नियमानुसार चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद तसेच मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!