चिमूरमध्ये ३० सप्टेंबरला रिपब्लिकन पक्षाचा ‘घोषणा दिवस’ समारंभ

संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर होणार विचारमंथन; हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

लुंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू येथे पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या घोषणा दिवसाला ७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिमूर येथे ३० सप्टेंबर २०२६ रोजी ‘घोषणा दिवस समारंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शेतकरी भवन, चिमूर येथे दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

यासंदर्भात २८ सप्टेंबर २०२६ रोजी लुंबिनी बुद्धविहार, वडाळा पैकू, चिमूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन घोषणा दिवस समारंभाची संपूर्ण माहिती पत्रकारांना देण्यात आली.
रिपब्लिकन पक्षाच्या घोषणेला ७० वर्षे पूर्ण होत असल्याने आयोजित या समारंभात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधानाची अंमलबजावणी, सामाजिक व आर्थिक न्याय तसेच नागरिकांच्या हक्कांबाबत विचारमंथन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ, रिपब्लिकन पक्षाची स्थापना तसेच पक्षाची सामाजिक व राजकीय वाटचाल यावरही कार्यक्रमात चर्चा होणार आहे. यासोबतच रिपब्लिकन चळवळीचे नव्याने संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांची खुली चर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कार्यक्रमाला मा. निलेश कराळे सर (वर्धा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. इंजि. सतीश पेदाम, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा ब्रिगेड यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मा. डॉ. अनमोल शेंडे, नागभीड करणार असून मा. भिक्खू ज्ञानज्योती महाथेरी यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या समारंभाला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि रिपब्लिकन चळवळीशी संबंधित बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन घोषणा समारंभ समिती व चिमूर रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

पत्रकार परिषदेला पूज्य भंते ज्ञानज्योती महास्थवीर संघरामगिरी, पूज्य भंते सूर्यज्योती, पूज्य भंते दिव्यज्योती, पूज्य भंते शांतिज्योती, धनराज गेडाम, शिवराम मेश्राम, विकास अंबादे, शारदा गेडाम, सुरक्षा अंबादे, विद्या गणवीर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमातून संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांवर व्यापक चर्चा होणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!