पवित्र पोर्टल द्वारा नवनियुक्त शिक्षकाचे उमरी चौ.शाळेत स्वागत
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२४/०९/२०२६
जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, उमरी चौ.येथे पवित्र पोर्टलअंतर्गत झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतून चैतन्य वाडीभस्मे यांची शिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.नुकतेच शाळेत रुजू होत त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेला प्रारंभ केला.
नवनियुक्त शिक्षक चैतन्य वाडीभस्मे यांचे शाळेचे मुख्याध्यापक कमलेश मडावी,विशेष शिक्षिका जनाबाई हेमणे,चेतना थोटे,पायदळवार,शैलेश खोडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक भुते,उपाध्यक्ष दिक्षा हुकरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त शिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व शैक्षणिक कौशल्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होऊन शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस तसेच सर्वांगीण प्रगतीस मोलाची भर पडेल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
नवनियुक्त शिक्षकाच्या आगमनामुळे शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक चालना मिळणार असून,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकवृंद, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!