रिसॉर्ट संचालकाची आत्महत्या; ताडोबातील कोलारा येथे खळबळ

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील  जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा परिसरात रिसॉर्ट संचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुणाल जयंत पटेल (वय ४२), रा. नवसारी, गुजरात असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
कुणाल पटेल हे कोलारा तु येथील जंगल मेडो रिसॉर्टचे संचालक असून ते प्रख्यात फोटोग्राफर म्हणूनही परिचित होते. मागील सुमारे १५ वर्षांपासून ते कोलारा परिसरात रिसॉर्ट व्यवसाय करत होते. ताडोबा परिसरातील वन्यजीव आणि निसर्ग छायाचित्रणाच्या क्षेत्रातही त्यांचा परिचय होता.

बुधवारी त्यांच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर कोलारा परिसरात खळबळ उडाली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे ताडोबा पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!