नवभारत कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद रामटेके यांची अविरोध निवड
नवभारत कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद रामटेके यांची अविरोध निवड
मूल : नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., मूलच्या अध्यक्षपदी नवभारत कन्या विद्यालय, मूल येथील शिक्षक मिलिंद ताराचंद रामटेके यांची अविरोध निवड करण्यात आली. संस्थेची बैठक २३ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी रामटेके यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. किसन वासाडे हे सेवानिवृत्त झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी मिलिंद रामटेके यांची अविरोध निवड करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिलिंद रामटेके यांच्या निवडीचे संस्थेचे सभासद, शिक्षकवर्ग तसेच विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी तसेच पतसंस्थेच्या प्रगतीसाठी रामटेके यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!