गणेशोत्सवातून आरोग्यसेवेचा जागर — एकलव्य गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम


(जवळपास शंभर नागरिकांची विविध आरोग्य तपासणी; आयुष्मान कार्डचीही सुविधा)
तळोधी-बाळापूर :
       बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी एकलव्य गणेश मंडळाचा गणेशमूर्तीसमोर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल व चरबी, तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, ईसीजी यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात जवळपास शंभर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल दिलीप कामडी, डॉ. रजनी हटवार, आरोग्य सेवक मेंढ, आरोग्य सेवक समर्थ, आरोग्य सेविका बारसागडे सिस्टर, भाकरे सिस्टर, महा लॅबच्या माधुरी शिवणकर , देशोन्नती प्रतिनिधी गोकुळ  पाकमोडे तसेच तळोधी परिसरातील आशा सेविका उपस्थित होत्या. आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी नागरिकांची विविध तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
 ‘सेवेतून भक्ती आणि भक्तीतून समाजहित’ अशी विधायक भावना या आरोग्य शिबिरातून अधोरेखित झाली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एकलव्य गणेश मंडळाचे अध्यक्ष सोनू भोयर उपाध्यक्ष छगन नागापुरे, सचिव निलेश मदनकर यांच्यासह हर्षद बोलणे, हर्षल जुमडे, साहिल दिगोरे, दुर्योधन मारबते, नागेश डहारे, आकाश मारबते, सागर डहाळे, राजेश डहारे, प्रशांत डहारे, हितेश बोडरे, निलेश कोळापे, पंकज मांडवकर, मयंक नानने, ईश्वर बानारकर, शरद भानारकर, अमित कुंबले, विकी खेडकर, विकास रुईकर, जीवन डारे, सौरभ मदनकर, गणेश नागापुरे, गणेश कुमटे, तारुण्य मारबते, सोनल पाकमोडे, चेतन डहारे, मनोज मानकर, सक्षम नैताम आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणासोबतच आरोग्य जनजागृती आणि समाजसेवेचा जागर घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी एकलव्य गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महा लॅबचे कर्मचारी तसेच आशा सेविकांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!