यंदाच्या ही शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत मूल च्या खेळाडू नी मारली बाजी
मूल
दि.20 सप्टेंबर रोजी रविवारला क्रीडा व युवक सेवा सचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धां पार पडली. दरवर्षी प्रमाणे मूल तालुक्यातील क्रीडा संकुल चे वेटलिफ्टिंग NIS कोच करण सुरेश कोसरे यांच्या कडे प्रशिक्षण घेत असलेले विविध शाळेतील खेळाडूंनी मूल तालुक्याचे प्रतिनिधित्व केले या स्पर्धेत मूल तालुक्यातील नवभारत विद्यालय, कर्मवीर महाविद्यालय, माऊन्ट कॉन्व्हेंट, अशा विविध शाळेच्या खेळाडूंनी मूल तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत एकूण अकरा खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत विजय संपादन केलेला आहे. यामध्ये 17 वर्षा आतील मुलींमध्ये 44 किलो वजन गटांमध्ये त्रिशा घोंगड , 48 किलो वजन गटांत ईशानी मोहूर्ले , 77 किलो वरील वजन गटांमध्ये प्रणाली झरकर, तर मुलांमध्ये 56 किलो वजन गटांमध्ये गुरविंदरसिंग बावरी, 60 कीलो वजन गटांमध्ये अनिश राऊत, 79 किलो वजन गटांमध्ये संस्कार नरेड्डिवार, तर 19 वर्षाखालील मुलींमध्ये 48 किलो वजन गटात, जसविंदर बावरी, 53 किलो वजन गटांमध्ये श्रावणी आंबूलकर, 58 किलो वजन गटांमध्ये शिवाणी वाढई, 86 किलो वरिल वजन गटांमध्ये नंदिनी चौधरी तर, मुलांमध्ये 65 किलो वजन गटांमध्ये अमन शेख या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे विजयी खेळाडू पुढे होणाऱ्या नागपुर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे तालुक्याचे ठिकाण असलेले मूल शहर क्रीडा क्षेत्रात भरभरुन कार्य करीत आहे असे दिसून येत आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मूर शहराने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येत आहे याचे कारण असे की गेल्या चार वर्षापासून मुल मध्ये निशुल्क वेटलिफ्टिंग च्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आणि सहाजिकच सुरुवातीपासूनच या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात भरीव काम केलेले आढळून येत आहे. आणि सलग यंदाही चंद्रपूर जिल्ह्यात वेटलिफ्टिंग मध्ये मूल शहराचेच नाव अव्वल ठरलेले दिसून येत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे सर, तालुक्याचे क्रीडा संयोजक नामदेवजी पिजुरकर सर, रुपचंद उराडे सर, आकाश चौधरी सर स्वप्निल अवघडे सर यांच्यातर्फे खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!