रेल्वेच्या धडकेत मादा अस्वलाचा मृत्यू, नागभीड - चंद्रपूर रेल्वे लाईन वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा.
(गोंदिया- बल्लारशाह रेल्वे ट्रॅकवर तळोदी वन परिक्षेत्रात अज्ञात रेल्वे धडकेत झाला मृत्यू. परिसरात आजपर्यंत रेल्वेच्या धडकेत सांबर, चितळ, नीलगाय, रानगवे, अस्वल, वाघ, बिबट यांचे मृत्यू)
(यश कायरकर, तालुका प्रतिनिधी) नागभीड/ तळोधी:
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोदी वन परिक्षेत्रातील आलेवही बीटातील कक्ष क्रमांक 94 मध्ये , अज्ञात रेल्वेच्या धडकेत एक पूर्ण विकसित अंदाजे (सहा ते आठ वर्षे वयाच्या) मादा अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्या परिसरात काम करणाऱ्या मजुरांना सकाळी रेल्वे लाईनच्या बाजुला अस्वल मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती तळोदी वन विभागाला देण्यात आली. उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी साहेब, ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी, यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ.महेश गायकवाड,तळोधी वन परिक्षेत्र अधिकारी तेजस बाळासाहेब सूर्यवंशी,बायोलॉजिस्ट राकेश अहुजा यांच्या निदर्शनात क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक बांगर मॅडम, यांनी वन्यजीव अभ्यासक व स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर व स्वाब चे बचाव दल प्रमुख जीवेस सयाम यांचे उपस्थितीत घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता सावरगाव येथील वन आगार मध्ये मृत अस्वलाला आणण्यात आले.
यानंतर डॉ. सतीश तांबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नागभीड, डॉ. ईशा आकरे पशुवैद्यकीय अधिकारी तळोधी, डॉ. कुंदन पोचलवार पशुवैद्यकीय अधिकारी टी.टी.सी. चंद्रपूर, यांनी अस्वलीचे शव विच्छेदन केले. यावेळी अस्वलाच्या रेल्वेच्या जोरदार धडकेमुळे आंतरिक भागातील तुटलेल्या बरगड्या ,अंतरिक जखमांवरून अस्वलाचे मृत्यू हे रेल्वेच्या धडकेत झाले असल्याचे निष्कर्ष निघाले. नंतर सावरगाव वन आगार येथे अस्वलाला जाळण्यात आले. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ.महेश गायकवाड,तळोदी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक सौ बांगर मॅडम, वन कर्मचारी, स्वाब संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जीवेश सयाम, पदाधिकारी गणेश गुरनुले, आदित्य नान्हे, शुभम निकेशर,तथा वनमजूर , वन कर्मचारी उपस्थित होते.
"विशेष म्हणजे गोंदिया बल्लारशा हा रेल्वे रूट नागझिरा, ताडोबा अभयारण्य तथा ब्रह्मपुरी वन विभागाच्या प्रादेशिक जंगलातून जात असल्यामुळे दरवर्षी या रेल्वे रूट वर वाघ, बिबट , अस्वल, रानगवे, नीलगाय, सांबर, चितळ, यासारख्या शेकडो प्राण्यांचे बळी जात असतात. हे जाऊ नये म्हणून संबंधित विभागाला वन्यजीव प्रेमींकडून सुरक्षेच्या उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र रेल्वे विभाग त्याकडे दुर्लक्ष करून दरवर्षी शेकडो वन्यजीवांचे जीव घेत असतो. त्यामुळे जंगल परिसरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या बाजूला जाळीचे कुंपण करून या वन्यजीवांचा जीव वाचवा अशी मागणी स्वाब संस्थेमार्फत करण्यात येत असून, वेळ पडल्यास आंदोलनही करू." असा इशारा स्वाब संस्था अध्यक्ष यश कायरकर यांनी दिला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!