महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे योग शिबीर संपन्न.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी श्री .जिवन कोंतमवार, वार्ड क्र .१४, मुल यांचे घरी*, योग शिबीर घेण्यात आले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
योगामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहाते. सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे हा उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
*योग शिक्षिका सौ .रजनी रामगिरवार यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली व त्यावर मार्गदर्शन देखील केले* .या उपक्रमासाठी न्यासाच्या वतीने सौ. भारती कोंतमवार आणि सौ.विणा मार्तीवार यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचा लाभ *१२* मुलांनी घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!