पवनीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; जवाहर गेट येथे ग्राम विकास संस्थेचा ध्वजारोहण सोहळा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि. १५ ऑगस्ट २०२६ भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जवाहर गेट, पवनी येथे ग्राम विकास संस्था, पवनी यांच्या वतीने भव्य ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमात भाजप गटनेते तथा नगर परिषद पवनीचे सुरेशजी अवसरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद पवनीचे उपाध्यक्ष सोनुभाऊ बावनकर होते.
यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष भुयार तिलकजी वैद्य, भाजपा मंडळ अध्यक्ष पवनी संदिपजी नंदरधने, भाजपा मंडळ अध्यक्ष अड्याळ प्रकाशजी कुझेकर, माजी नगराध्यक्ष मोहनभाऊ सुरकर, भंडारा जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलासभाऊ काटेखाये, लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिलजी मेंढे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराजजी जिभकाटे, माजी सभापती पंचायत समिती पवनी डॉ. सुनिल जिवनतारे, माजी संचालक महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ मुंबई राजुभाऊ रेवतकर, ग्राम विकास संस्थेचे संस्थापक सचिव मनोहरराव बावनकर, देवाजी बावनकर, शंकरराव बिलवणे, विनोद दुर्गे, संजयजी सावरकर, मुलचंदजी मोहरकर, सौ. कल्पनाताई पंधरे यांच्यासह भारतीय तैलीक शाहू रठौर महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते अँड. एकनाथराव बावनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी एकजुटीने आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम विकास संस्थेचे कार्यालयीन सचिव राजेश येलसट्टीवार सर यांनी केले.
जवाहर गेट परिसरात नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने भारावून गेले होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!