NEET व TET पेपरफुटी प्रकरणाचा निषेध; चिमूरमध्ये 20 जुलै रोजी सामूहिक धरणे आंदोलन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात NEET व TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चिमूर तालुक्यातील विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय संघटनांच्या वतीने सामूहिक रित्या सोमवार, 20 जुलै 2026 रोजी दुपारी वेळ 12:00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिमूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन व जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयोजकांनी चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आंदोलनास परवानगी देण्याची विनंती केली आहे. निवेदनानुसार, NEET व TET पेपरफुटीमुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने काढण्यात येणार असून, हातात फलक घेऊन विद्यार्थी व नागरिक तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढतील. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर सभा घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.
या आंदोलनात चिमूर तालुक्यातील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!