वृक्षारोपण ही काळाची गरज; व्यसनमुक्तीचा संकल्प देत अमोल मडामे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

वृक्षारोपण ही काळाची गरज; व्यसनमुक्तीचा संकल्प देत अमोल मडामे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जीवती तालुक्यातील अंब्रु नाईक आश्रमशाळेत वृक्षारोपण व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक अमोल मडामे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर येथील श्री. रोहन कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. यावेळी नशाबंदी मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक इला मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट व केकचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते, चंद्रपूर जिल्ह्यातील व्यसनमुक्ती अभियानाची टीम तसेच आश्रमशाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!