मूल येथे १ ऑगस्ट रोजी डॉ. ममतानी यांचे मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर

मूल येथे १ ऑगस्ट रोजी डॉ. ममतानी यांचे मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर
मूल : प्रतिनिधी


पूज्य सिंधी पंचायत, मूल आणि आरोग्यधाम हेल्थकेअर सोसायटी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी ३०३ वे भव्य मोफत आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत श्री झूलेलाल मंदिर, ताडाळा रोड, गणेश मंदिराजवळ, मूल येथे होणार आहे.
‘घराघरात आयुर्वेद’ हा उद्देश समोर ठेवून जीकुमार आरोग्यधामचे संचालक डॉ. जी. एम. ममतानी आणि डॉ. अंजू ममतानी राज्यभर नियमित आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करीत आहेत. त्याच उपक्रमांतर्गत मूल येथे हे शिबिर होत आहे.
या शिबिरात संधिवात, पक्षाघात, गाऊट, सायटिका, स्नायू व सांध्यांचे विकार, ऑस्टिओपोरोसिस, स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क, फ्रोजन शोल्डर, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, थायरॉईड विकार, दमा, मायग्रेन, मूत्रपिंड व प्रोस्टेटचे विकार, मूळव्याध, त्वचारोग, पांढरे डाग, सोरायसिस, निद्रानाश, नैराश्य, स्त्रीरोग, वंध्यत्व, लठ्ठपणा, केस गळणे तसेच इतर विविध आजारांवर मोफत आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारासंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पूज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष अमर आयलानी आणि उपाध्यक्ष विजय केशवानी यांनी सांगितले की, शिबिरात येणाऱ्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तातील साखर (ब्लड शुगर), रक्तदाब (ब्लड प्रेशर) तपासणी करण्यात येईल. तसेच 'स्वास्थ्य वाटिका' हे आरोग्यविषयक मासिकही विनामूल्य देण्यात येणार आहे.
इच्छुक नागरिकांनी १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शिबिरस्थळी नोंदणी करावी. तसेच पूर्वनोंदणीसाठी जीकुमार आरोग्यधाम, नागपूर येथे ०७१२-२६४५६००, ०७१२-२६४६६०० किंवा ९३७३३९७२५८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!