महात्मा फुले–सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम तातडीने सुरू करा - आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

महात्मा फुले–सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम तातडीने सुरू करा
मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश


मूल, दि. २१ जुलै :
मूल शहरातील महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाचे मंजूर काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांना दिले आहेत.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष राकेश देवाजी मोहुर्ले यांनी आमदार मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर निधी उपलब्ध असूनही कामास अद्याप सुरुवात झालेली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच १५ दिवसांच्या आत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला.
निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद मूल यांना सौंदर्यीकरणाचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. मंजूर निधीचा योग्य वापर करून कामाला गती देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
यावेळी राकेश मोहुर्ले यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत, महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला साजेसे चौकाचे सौंदर्यीकरण लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!