मूलचे दोन युवक दिल्लीच्या जंतर-मंतरवर; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात सहभागी
मूलचे दोन युवक दिल्लीच्या जंतर-मंतरवर; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
मूल (जि. चंद्रपूर) :
सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्तरावरील जनआंदोलनात सहभाग नोंदविण्याची प्रेरणादायी भूमिका मूल येथील दोन युवकांनी घेतली आहे. लडाखमधील प्रख्यात पर्यावरण कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मूल शहरातील सुचित (बबलू) सहारे आणि अनिल गिरडकर हे दिल्लीत दाखल झाले आहेत.
लडाखमधील पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण आणि शाश्वत विकासाशी संबंधित विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होत आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. पर्यावरण संवर्धन, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत जनजागृती घडवून आणण्याचा संदेशही त्यांनी दिला.
देशभरातील विविध राज्यांमधून नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत असून, महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने युवक या चळवळीशी जोडले जात आहेत. अशा वेळी मूलसारख्या छोट्या शहरातील युवकांनी दिल्ली गाठून राष्ट्रीय प्रश्नांप्रती आपली संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी दाखविल्याने परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहून सकारात्मक बदलासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा या सहभागातून युवकांना मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
वृत्त संकलन : योगेश कटकमवार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!