विदर्भ राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षा उत्साहात संपन्न; भंडारा जिल्हा असोसिएशनचा पुढाकार
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२०/०७/२०२६ भंडारा जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या वतीने नुकतेच स्थानिक सेंट पाल हायस्कूल येथे विदर्भ राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परीक्षेच्या माध्यमातून विदर्भातील खो-खो खेळाच्या तांत्रिक प्रगतीसाठी नव्या पंचांची फळी तयार करण्याचा मानस स्पष्ट झाला.
या परीक्षेचे संचालन मुख्य परीक्षक म्हणून संजय घवघवे यांनी केले. यावेळी त्यांना एस. एस. वाहाब (गोंदिया) आणि रेवतकर सर यांनी मोलाचे सहकार्य केले. परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांची मैदानी कौशल्ये आणि नियमावलीच्या ज्ञानाची परखड तपासणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
असोसिएशनचे यशस्वी नियोजन:
या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन भंडारा जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे सचिव पुरुषोत्तम सेलोकर, अरुण बांडेबुचे, मधुकर गायधने, प्रशांत कुकडे, बेनिलाल चौधरी,सतीश पाल आणि मोहन दाढी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या क्रीडाप्रेमींनी आणि उमेदवारांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा परीक्षामुळे खो-खो खेळाच्या दर्जात्मक वाढीस मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!