आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै रोजी मूल येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर'
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली २१ जुलै रोजी मूल येथे 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर'
मूल, दि. २० जुलै :
महाराष्ट्र शासनाच्या गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आधारस्तंभ अभियान राबविण्यात येत असून, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' चे आयोजन दि. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, मूल येथील सभागृहात करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मूल तालुक्यातील सर्व शासकीय विभाग एकाच छताखाली नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणार आहेत. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
शिबिरात आयुष्यमान कार्ड वाटप, पीक नोंदी व ७/१२ ऑनलाइन अंमलबजावणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण, आरोग्य शिबिर, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, अभिलेख दुरुस्तीसाठी हेल्प डेस्क, मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत विशेष शिबिर, तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत रहिवासी, जातीचा, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, मतदार कार्ड, रेशन कार्ड व महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तहसीलदार मृदुला मोरे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या समाधान शिबिराला उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!