NEET व TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे दि. २० जुलै २०२६ रोजी देशभरात गाजत असलेल्या NEET व TET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच अन्य राजकीय पक्ष तथा विविध संघटनेच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. हुतात्मा स्मारक याठिकाणा वरून तहसील कार्यालय चिमूर याठिकाणी आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडून सामूहिकरित्या सर्वांच्या वतीने चिमूर येथील तहसीलदार श्रीधर राजमाने यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन राष्ट्रपती महोदयांना उद्देशून देण्यात आले असून त्याची प्रत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, चिमूर यांना देण्यात आली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजूट राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!