अड्याळ येथील वनपरीक्षेत्राधिकारी कार्यालयात निरोप आणि स्वागत समारंभ संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय अड्याळ येथे कार्यालयीन बदली अंतर्गत बदलून गेलेल्या आणि नव्याने रुजू झालेल्या वनपाल आणि वनरक्षक यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरीक्षेत्राधिकारी योगेश शर्मा हे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन सहाय्यक वन संरक्षक भंडारा (रोहयो व वन्यजीव )सचिन निलख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पवनी तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
अड्याळ येथील कार्यालयातून बदलून गेलेल्या आणि त्यांचे ठिकाणी नव्याने रुजू झालेल्या वनपाल आणि वनरक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अड्याळ वनपरीक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किटाडी क्षेत्राचे वनपाल मुकेश शामकुवर यांनी केले. सूत्रसंचालन वनरक्षक निलेश श्रीरामे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार केसलवाडा बिटचे वनरक्षक दिनेश बोरकर यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!