पवनी येथे किसान गोष्टी व शेतकरी मेळाव्याला उदंड प्रतिसाद
शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांकडून आधुनिक शेती व तंत्रज्ञानाचे धडे
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - कृषी विभाग व आत्मा (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान गोष्टी व शेतकरी मेळावा अत्यंत उत्साहात आणि शेतकरी बांधवांच्या उदंड प्रतिसादात पार पडला.कार्यक्रमाचे आयोजक पवनी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्या सुयोग्य नियोजनाखाली आयोजित या मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, कीड व्यवस्थापन, पावसाळ्यातील जनावरांचे आरोग्य, तसेच कृषी विभाग व 'आत्मा'च्या विविध योजनांवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी प्रमोद मेंढे (उपसभापती, पंचायत समिती पवनी), अनिल धकाते (शिवसेना शहर प्रमुख) आणि विजय काटेखाये (शिवसेना उप जिल्हा प्रमुख) यांनी शेतकरी सक्षमीकरणासाठी सदैव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. तसेच या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य शेखर पडोळे,बादल ठवरे,सुवर्णा रामटेके, नूतन कुर्जेकर,स्मिता गिरी तसेच माजी उपसभापती विनोद बागडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
ह्याप्रसंगी प्रगतशील शेतकरी यादवराव मेंढे व पुंडलिक घ्यार यांची विशेष उपस्थिती होती.
मेळाव्यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी सन 2023' पुरस्काराने सन्मानित निलजचे नरेश ढोक यांनी शेतीतील नवनवीन प्रयोगांची माहिती दिली. याप्रसंगी श्री.ढोक यांचे सपत्नीक शाल, श्रीफळ व कृषी संवादिनी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी नरेंद्र आयतुलवार यांनी स्वतःच्या शेतीतील अनुभवांतून समृद्ध शेतीचा मार्ग उलगडून दाखविला.
अजय राऊत प्रकल्प उपसंचालक (आत्मा), भंडारा यांनी 'आत्मा' अंतर्गत मिळणारे तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती दिली. डॉ. अश्विन मेश्राम (सहाय्यकl उपआयुक्त, पशुसंवर्धन) यांनी शेतीपूरक जोडधंदा आणि शेती-आयुष्यात ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले.डॉ. प्रविण खिरारी यांनी पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांचे आरोग्य, गोठ्याची स्वच्छता व आजारांपासून बचावाचे उपाय सांगितले.डॉ. प्रशांत उंबरकर (कीटकशास्त्रज्ञ) यांनी पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन व पीक संरक्षणाचे उपाय सांगितले.
डॉ. उषा डोंगरवार (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, साकोली) यांनी प्रयोगशाळेतील संशोधन थेट बांधापर्यंत पोहोचवून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले.या शेतकरी मेळाव्यात पीएमएफएमई (PMFME) योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये कच्ची घाणी तेल, मसाले उत्पादने, दूध उत्पादने यांचा समावेश होता. तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, 'कृषी ताई' व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवनी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांनी केले.ह्या संपूर्ण शेतकरी मेळाव्याचे आकर्षक आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी भूमेश नवखरे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि उपस्थितांचे आभार उप कृषी अधिकारी भारती येरणे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता दिनेश काटेखाये (मंडळ कृषी अधिकारी पवनी),विजय हुमणे (मंडळ कृषी अधिकारी कोंढा),विलास गहाणे (उप कृषी अधिकारी पवनी), लता गभणे (उप कृषी अधिकारी), कु. किर्ती भार्गव (सहायक कृषी अधिकारी), कु.भाग्यश्री बाळसकर (कनिष्ठ लिपीक) यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!