नीट पेपरफुटी प्रकरणावरून चिमूर काँग्रेस आक्रमक

देशाचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व खा.प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयापुढे करण्यात आले आंदोलन

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - शिक्षण व्यवस्थेतील कथित नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी तसेच खा.प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ चिमूर तालुका काँग्रेस कमिटीने गुरुवारी तहसील कार्यालयापुढे जोरदार आंदोलन करत प्रशासनाला निवेदन सादर केले.
       चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात,नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,अशी ठाम मागणी करण्यात आली. 
        तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध नोंदवून,विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला.
         केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
         आंदोलनादरम्यान सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे थांबवावे,दोषींवर कठोर कारवाई करावी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे,अशी मागणी करण्यात आली.
        निवेदनावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास धरणे आंदोलन,उपोषण आणि तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला.
      काँग्रेसचे जेष्ठ नेते राम राऊत,चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावडे पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबिसी विभागाचे उपाध्यक्ष धनराज मुगले,काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय घुटके,काँग्रेसचे जेष्ठ नेते गजानन बुटके,काँग्रेस जेष्ठ नेते जुनेद खान,विजयकुमार घरत,चिमूर तालुका काँग्रेस अनु.सुचित जाती विभागाचे अध्यक्ष सप्निल मालके,काँग्रेस नेते शांताराम सेलवटकर,काँग्रेस जेष्ठ नेते राजू लोणारे,काँग्रेसचे जेष्ठ नेते धनराज वंजारी,अल्पसंख्याक अध्यक्ष बब्बू खान,चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत डवले,चिमूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे,जिल्हा महासचिव रोहन नन्नावरे,संघटक अक्षय लांजेवार,श्रिकांत गेडाम,गणेश कारेकर,काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश दडमल,दुर्योधन तांबरभोगे,राजू चौखे,रत्नाकर विटाळे,अशोक कामडी,युवकचे जेष्ठ नेता रामदास चौधरी,काँग्रेसचे जेष्ठ नेते विलास पिसे,हितेश शेडाम,माणिकराव नगराळे,बशीर शेख,लोमेश शिरपूरकर,अरुण लाजेकर,समशेर पठाण,मनोज दिघोरे,दिगाबर लोथे,संजू पिसे,प्रकाश डुकरे,अरुण पिसे,पुरुषोत्तम इंदुरकर,रिता अंबादे यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!