विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सावलीत पालक-विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा - दिल्लीतील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध @ जिल्हा परिषद शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्याची जोरदार मागणी

 


सावली : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानमंत्री यांचा राजीनामा आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी सावली शहरात पालक व विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

         हातात फलक व घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध, नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेवर नैतिक जबाबदारी टाकून त्यांचा राजीनामा, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या रिक्त शिक्षक पदांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चा तहसील कार्यालयाच्या पटांगनात पोहचल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी भाषणाच्या माध्यमातून सरकारच्या दडपशाहीवर जोरदार हल्ला केला. 

          यावेळी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना तर सावली तालुक्यात ७२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत व असलेल्या शिक्षकांमधून एस आय आर ची कामे करुन घेत असल्याने शिकवणीकडे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षक भरतीसाठी मुख्यमंत्री यांना प्रशासनामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात दिल्लीतील लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जिल्हा परिषद शाळांमधील सर्व रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थी व शिक्षणाशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!