महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आषाढी एकादशी निमित्त शेगाव बु. येथील भारतीय जनता पार्टी कडून रक्तदान शिबिराचे आयोजन विठ्ठल मंदिर शेगाव बु. येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे, यांच्या हस्ते करण्यात आले.असुन आमदार,करण संजय देवतळे, यांनी आपल्या भाषणातून "रक्तदान हेच श्रेष्ठदान'' हा संदेश भारतीय जनता पार्टी कडून प्रत्येक गावागावांमध्ये रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेऊन पोहोचवणे गरजेचे असून सर्वांनी वेळोवेळी रक्तदान करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सरपंच सिद्धार्थ पाटील, सुरज लोणकर ,अजय लोडे,अमर निखाडे, रमेश मानकर, नामदेव वराडे, मोरे सर,राजुभाऊ बच्चूवार,शरद कष्टी, सुनील बोंडे, सुनील भोयर वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष झाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत नागरिकांनी नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन संयोजिका वंदना दाते व सहसंयोजक ईश्वर नरड यांच्या पुढाकाराने करण्यात आले, जवळपास 34 व्यक्तींकडून रक्तदान यावेळी करण्यात आले असुन या कार्यक्रमातील रक्तसंकलनाची जबाबदारी जीवन ज्योती ब्लड बँक, नागपूरच्या वैद्यकीय पथकाने पार पाडली. या पथकात डॉ. यश हिंगणे, किशोर खोबरागडे, प्रशांत बाराई, पायल सिर्साट, विभा गजभिये, अनिता कोलते, रविंद्र साखरकर राहुल भोयर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता विठ्ठल मंदिर संस्था समिती सर्व स्वयंसेवक तसेच राकेश काथवटे, महेश देवतळे, गणेश काथवटे, यश काथवटे, विजय बरड़े,रुपेश फुटाणे , मंगेश साखरकर, सौरभ पवार, पत्रुजी फुलकर, विकास ठाकरे, मंगेश फुलकर , निखिल मसे , हरीश दादरकर, रोसन चैवरे,सुरज सूर्यवंशी, प्रकाश वाढीई,मंगेश फुलकर ,भूषण चाफले यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!