मत परिवर्तनातून व्यसनमुक्ती कडे

मत परिवर्तनातून व्यसनमुक्ती कडे 


 चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात मारोडा हे गाव अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ चारही बाजूने गर्द हिरवा निसर्ग असे मनोहारी दृश्य असलेला सोमनाच्या पायथ्याशी वसलेलं मारोडा हे गाव राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील येथे 18 पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात गावात मुख्य व्यवसाय शेती आणि मच्छीमारी,रस्त्याच्या कडेने जाताना मच्छीचा घमघमाट सुटतो.येथे असलेले माजी सरपंच बबनराव पानगंटीवार यांच्या पोटी जन्म घेतलेला सुपुत्र सुमंत. सुमंतला तीन भाऊ, दोन बहिणी, वडील सरपंच आणि आई महिला मंडळात सक्रिय अशा प्रकारे घरी समाजकार्याचे बाळकडू घेतलेला सुमंत अतिशय धडपडा मुलगा लहानपणापासूनच समाजकार्याची आवड कुणालाही मदत करणे हा त्याचा स्वभावधर्म.
     सुमंत ने आपले ग्रॅज्युएशन झाल्यानंतर चंद्रपूर येथे समाज कार्य महाविद्यालय प्रवेश घेतला. समुदाय संघटन हा त्याचा विषय कॉलेजमध्ये अत्यंत लोकप्रिय वर्ग मित्र-मैत्रिणींमध्ये मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे सुमंत हा सगळ्यांना हवाहवासा वाटायचा कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये तो भाग घ्यायचा. असा हा कॉलेजच्या प्राध्यापकांमध्ये लोकप्रिय असलेला सुमंत समाजकार्य पदवी प्राप्त झाल्यानंतर अल्पकालावधीतच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर एड्स नियंत्रण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाला. एड्स विभागात काम करीत असताना अनेक लोकांचा संपर्क आल्यानंतर त्याला मद्यपानाचे व्यसन कसे लागले हे कळले देखील नाही.सुरुवातीला पार्टीमध्ये थोडी थोडी घेताना तो पूर्णपणे व्यसनाधीन कसा झाला हे त्याला समजले नाही. याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक परिस्थितीवर झाला घरामध्ये पैशाची चणचण भासू लागली, घरात वातावरण ताणतणावाचे होऊ लागले. प्रसंगी तो रजेवर पण राहू लागला. मित्र घरी येईनासे झाले. एकंदरीत सामाजिक अप्रतिष्ठा, नैराश्य, मानहानीचे प्रसंग अशा विविध प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेवटी त्याची पत्नी हेमलता हिने पुढाकार घेऊन त्याला पूर्ण परिस्थिती समजून सांगितले जर हे व्यसन कमी झाले नाही तर आपल्या कुटुंबात अधिक कलह होईल. तरीपण सुमंतला समजत नव्हते. कसं बस सुमंत एका अल्कोहोलिक अनालिसिस समूह मंडळांच्या संपर्कात आला.त्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले.त्यानंतर सुमंतला लक्षात आले आपण आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे.या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते हे त्याच्या लक्षात आले. त्यामध्ये त्याच्या घरात त्याच्या मोठ्या भावाचा अतिमद्य प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला शेवटी घाबरून आपलेपण असंच होईल. आपली पूर्णपणे सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. हे त्याच्या लक्षात आले.यातून आपल्याला बाहेर पडावेच लागेल हा त्याच्या मनाने निर्धार केला. तो नियमितपणे त्या बाबूपेठ येथिल अल्कोहोलिक ॲनिमसच्या मिटींगला हजर राहू लागला.रोज त्याचे पाय मद्यपानाकडे न जाता, मीटिंग कडे वळू लागले. तो रोज मीटिंगमध्ये मी आज मद्यपान करणार नाही अशी शपथ घेऊ लागला आणि ती शपथ तू प्रामाणिकपणे पाळू लागला. आज तो पूर्णपणे व्यसनातून बाहेर पडला आहे. मित्रांनो मनाचा निर्धार हाच व्यसनमुक्त होण्याचा पहिला पाया आहे. हे सुमंतच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.


     सुमंत समाजकार्याचा विद्यार्थी त्याला अवतीभवती व्यसनी लोक दिसले, की तो खूप अस्वस्थ व्हायचा. त्यात त्याचा मोठा भाऊहि व्यसनाने दगावला होता. व्यसनांमुळे आलेले दुःख, अपमान आणि कौटुंबिक कलह  त्याने अनुभवले होते. त्याला वाटले मी जसा व्यसनमुक्त झालो तसंच इतर व्यसनी व्यक्तींना सुद्धा आपल्याला व्यसनमुक्त केलं पाहिजे.अशा लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे. त्याने हा विचार त्याची पत्नी हेमलता हिला बोलून दाखवला.हेमलता या उच्चशिक्षित असून राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपूर येथे सहयोग प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. या दांपत्याने  विचार विनिमय करून आपणच अशा लोकांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील राहू.असा निर्धार केला आणि या निर्धारातून माई फाउंडेशन ची 2025 ला स्थापना केली आणि या फाउंडेशन अंतर्गत  स्वखर्चाने  एका सुसज्ज असं सोमनाथ व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. यामध्ये रुग्णांसाठी पूर्ण सेवा देण्यात येते.सुमंत स्वतः समुपदेशक आहे. त्यांनी आपल्या सोमनाथ व्यसनमुक्ती प्रकल्प मारोडा या केंद्रात रुग्णांना प्रसन्न अशा वातावरणात रुग्णांना  निवास जेवण उत्कृष्ट दर्जाचे देण्यावर भर दिला. हे 25  बेड चे सुसज्ज असे व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्राची खासियत ही की येथील रुग्णांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्यावर भर असणार आहे.
        नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार सुधीर भाऊ मुन्गंटीवारं यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य संध्याताई गुरनुले, डॉ.गुलवाडे, मन : चिकित्सक डॉ. किरण देशपांडे, शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके इत्यादी मान्यवरांनी  उपस्थित राहुल शुभेच्छा दिल्या.
    अशाप्रकारे आमचा समाजकार्यचा मित्र असलेला सुमंत बबनराव पानगंटीवार यांनी  मद्यपानाने कसा स्वतःचा आणि समाजाचा विनाश होतो हे अनुभवून. स्वतः व्यसनमुक्त होऊन व्यसनमुक्तीचे केंद्र स्थापन करून एक कृतिशील सकारात्मक  नवनिर्मिती केली. आज मुल मारोडा मार्गावर सोमनाथ कडे जाताना आपल्याला सोमनाथ व्यसनमुक्ती केंद्र मारोडा अशी पाटी दिसेल.. नक्कीच प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपले जीवन अंधकारापासून वाचवायचे असेल तर यात आपले उपचार करण्यासाठी प्रवेश घ्यावा. समुपदेशनाबरोबर, उपचार, उत्कृष्ट निवासाची व्यवस्था, तसेच रोजगार इत्यादी व्यवस्था येथे आहे. सुमंत तुझ्या या नवनिर्मितीला नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई कडून खूप शुभेच्छा...

इला मेश्राम 
चंद्रपूर जिल्हा संघटक 
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई.
Msw,B.Ed
 Medical &psychotric 
(counceller )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!