वाघांचे हल्यात गुराखी गंभिर जखमी;




तळोधी (बा.) बातमीदार:-
       वनपरिक्षेत्र तळोधी अतंर्गत सावंगी बडगे येथिल गुराख्यावर वाघाने हल्ला करून गंभिर जखमी केल्याची घटना आज १२ वाजताचे दरम्यान घडल्याने परिसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे.
   कांचन प्रकाश खोब्रागडे (वय ३० वर्ष) रा. सावंगी (बडगे) हा नेहमी प्रमाणे स्वत:चे म्हैस बैल घेवून जंगल परिसरात जाता असतांना गोसेखुर्द कालव्याजवळ दबा बसलेल्या पट्टेदार वाघाने गुराख्यावर हल्ला करुन फरकडत नेले. मात्र वाघांचे जबड्यातून सुटका करुन आरडाओरडा केला असता रवी वाडगुरे यांनी धाव घेत जखमी गुराख्याला मदत करतं गावाता आणले. घटनेची माहिती वनविभागाला दिली. मात्र गावकऱ्यांनी जखमी इसमाला तळोधी येथे प्राथमीक उपचारार्थ दाखल केले. दरम्यान वनविभागाचे अधिकाऱ्यांनी तळोधी वरून जखमी इसमास सिन्देवाही उपचारांसाठी घेवून गेले. तेथे प्राथमिक उपचार करुन चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापुर्वीही या परिसरात वाघाचे हल्यात अनेक गुरेढोरे ठार गेल्याच्या घटना घडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.आजच्या घटनेने गावात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असुन या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा असी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!