ग्रामीण भागातील विकासाला चालना कधी मिळणार प्रशासन,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
ग्रामीण क्षेत्र विकासापासून वंचित
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव हे गाव तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे गाव असून या गावात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेला महत्त्व दिले जाते तरीसुद्धा वर्षानुवर्षे हे गाव तसेच परिसर विकासापासून दूर असून आजही वंचित राहिलेले आहे.
या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या वर असून बाजारपेठेला 50 ते 60 गावे जोडलेली आहे तसेच इंग्रज काळापासून पोलीस स्टेशन असून या पोलीस स्टेशनला 102 गावे जोडलेली आहे, या गावात दोन शाळा,आरोग्य वैद्यकीय दवाखाना, पशु दवाखाना, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, कपास जिनिंग, बाजार समिती,राईस मिल, देशी,विदेशी दारू कृषी केंद्र,बँँक ईतर दुकाने असून मोठी बाजार मार्केट लाईन या ठिकाणी आहे, तरीसुद्धा नागरिकांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
सगळीकडे शाळा सुरू झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येथे येत असतात, तसेत परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महीला, नागरिक दवाखाना,किराणा, शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात आजही मागील अनेक वर्षापासून नागरिकांना शेगाव, बु.भेंडाळा,चारगाव( खु )या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे गावाकडे जातांना महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागते तसेच या ठिकाणावरून चिमुर,वरोरा 353 ई राज्य मार्ग असून अरुंद रस्त्या अभावी वाहनांची वाहतुकीची कोंडी बाजाराच्या दिवशी होत असते, रस्त्याच्या मध्ये भागात डिव्हायडर असून मोठ्या प्रमाणात ठीक ठिकाणी डिव्हायडरवर कचरा साचलेल्या दिसून येत आहेत, तसेच डी वाँयडरवर कुठेही स्ट्रीटलाईची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या सुमारास वाहनधारक चालकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
आजही ग्रामीण भागातील पांदन रस्ते अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात दिवसात ग्रामीण भागातील पांदण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असुन शेतकऱ्यांना खते,बियाणे, शेती उपयोगी साहित्य,बैल बंडीची वाहतूक कोंडी नेहमी निर्माण होत आहे, तसेच मजुरांना शेतात येता, जाताना त्रास सहन करावा लागतो.ग्रामीण भागात आजही जनतेला शुद्ध पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे पावसाळ्याचा दिवसांमध्ये अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून सर्वसामान्य जनतेला प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतामुळे सोई, सुविधेपासून जनतेला वंचित राहावे लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!