अवैध रेती तस्कराची वनकर्माचाऱ्याला धक्काबुक्की व अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जिवंत मारण्याची धमकी

पोलीस स्टेशन शेगाव येथे चार अवैध रेती तस्करांवर गुन्हा दाखल 

तिघांना अटक तर एका आरोपीचा शोध सुरू 

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वनपरिक्षेत्र खडसंगी अंतर्गत येत असलेल्या बेंबळा, वायगाव जंगल परिसरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगलालगत वनरक्षक गस्तीवर असताना नाल्यातून दिवसा अवैध रेती वाहतूक करीत असल्याचे गस्तीवर असलेल्या वनकर्मचारी प्रमोद लूचे यांनी पायदळ जाऊन बघितले असता एक ट्रॅक्टर अवैध रेती तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने कर्मचारी यांनी तपासणी केली असता ट्रॅक्टर मध्ये काही प्रमाणात रेती असल्याचे दिसून आले त्यामुळे कर्मचारी यांनी संबंधित ट्रॅक्टरची माहिती वरिष्ठांना देऊन कारवाई करत असताना आरोपी नामे साहिल नरड  राहणार शेगाव वय वर्ष 24, किरण गडमडे  वय वर्ष 26 रोशन चौधरी वय वर्ष 23 व पप्या तिन्ही राहणार वायगाव भोयर यांनी संबंधित वन कर्मचारी प्रमोद लुचे यांना धक्काबुकी करत अश्लील भाषेत शिवीगाळ  केली व जिवंत मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित वन कर्मचारी यांनी शेगाव पोलीस येथे तक्रार दाखल केल्याने शेगाव पोलीस यांनी आरोपीविरुद्ध संबंधित गुन्ह्यावरून कलम 132, 3003(2), 296, 351(2), 3 (5)व बी. एन. एस.  कलम 7,8, 48 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गुन्हा दाखल केला असून, न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी  तीन्ही  आरोपींना चार दिवसीय पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे तसेच 14 दिवसीय मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे.  संबंधित गुन्ह्यात वापर करण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉली यावर मागे पुढे कुठेही नंबर लिहिलेला नसून शेगाव परिसरात अशा प्रकारे अवैध धंद्यात  वापरण्यात येणाऱ्या  अशा प्रकारे विना नंबरच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे  याकडे पोलीस विभाग जातीने कधी लक्ष देणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!