तळागाळातील कर्तृत्वाला सलाम !‘लोकप्रेरणा पुरस्कार २०२६’ने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - समाजाच्या विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे आणि सातत्याने कार्य करणाऱ्या तळागाळातील कर्तृत्ववान व्यक्तींचा रेडिअन्स फौंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘लोकप्रेरणा पुरस्कार २०२६’ने सन्मान करण्यात आला. कोलारा गेटजवळील अजिंक्य रिसॉर्ट येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात रेडिअन्स फौंडेशनचे अध्यक्ष घनश्यामजी पिसे व प्रभाकरजी पिसे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, क्रीडा, पत्रकारिता, उद्योजकता आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श उभा करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘लोकप्रेरणा पुरस्कार’ सातारा (ता. चिमूर) गावचे सरपंच गजुभाऊ गुडधे यांना प्रदान करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे कार्य करत आदर्श नेतृत्व निर्माण करून सातारा गावाला आदर्श गाव बनविण्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून व्यावसायिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे नितेश गणवीर, शिगाल पाटील, लिलेश्वर कोसे, प्रमोद पिसे, किशोरजी मगरे आणि उत्कर्ष पिसे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात मागासलेल्या परिसरात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करणारे सुरेश दागोजी पिसे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात कराटेमध्ये ‘शिफु’ आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे सुशांत इंदोरकर, योगशास्त्राच्या माध्यमातून समाजसेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे निरंजन बोरकर, सामाजिक व राजकीय क्षेत्रात जनहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे विलासजी रामचंद्र डांगे, पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे योगेशजी सहारे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने पुढाकार घेणारे कवडुजी लोहकरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

पुरस्कारार्थींच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या समाजोपयोगी योगदानाचे कौतुक केले. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास आयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विलासजी दिघोरे, आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, वामन धारने आणि रामकृष्ण उपलांटीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!