सावली नगरपंचायतच्या पोटनिवडणुकीत सोनी खोब्रागडे यांची बिनविरोध निवड
सावली - नगरपंचायत सावलीची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली मात्र काँग्रेसच्या सोनी आकाश खोब्रागडे यांच्या विरोधात एकही उमेदवार उभे न राहिल्याने त्यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे.
सावली नगरपंचायत येथील प्रभाग १६ मध्ये माजी नगराध्यक्षा लताताई लाकडे या प्रतिनिधित्व करत होते मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या एका जागेसाठी नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली मात्र या जागेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सोनी आकाश खोब्रागडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. या जागेवर भाजपा किंवा इतर पक्षांनी उमेदवार न दिल्याने सोनी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विधानसभेचे गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, नगराध्यक्ष साधनाताई वाढई, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्ष उषाताई भोयर, शहर अध्यक्ष क्रिष्णा राऊत, युवक शहर अध्यक्ष अंकुश शेंडे यांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!