लोकांच्या चुका आणि वनविभागाचा ससे मिरा.'
(घरात घुसलेल्या चोरांनाच सुखरूप घरापर्यंत सोडणारा विभाग)
जर कोणी चोर गल्लीत, मोहल्यात, किंवा गावात, जरी आला तरी त्याला पिटाळून लावण्याची व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रथा जगभर आहे. जेणेकरून चोरांनी त्या परिसरात पुन्हा पाय ठेवू नये आणि परिसर सुव्यवस्थित सुरक्षित रहावा. मात्र अगदी या सर्वांच्या विरोधात वन विभागाच्या बाबतीत जे घडते घडत असते ते अधिकाऱ्यांना सुद्धा मान्य नसेल, मात्र काही हाफ लीडर आणि आमदार, खासदारांच्या दबावात शांत बसावे लागते.*
*वन विभाग च्या बाबतीत जे घडते ते.... चोर येतात (जंगलात म्हणजेच वनविभागाच्या हद्दीत) घुसतात लाकडे चोरतात, अतिक्रमण करतात, जंगल चोरतात, शिकारी करतात, रात्रभर वाघ पाहण्याच्या नादात प्रतिबंधित जंगलात पानवट्याजवळ आणि वाघाच्या समोर गाड्या घेऊन घुसतात, आणि आता तर 25 लाखाच्या लालचे मध्ये आत्महत्या करण्याकरिता सुद्धा विभागाचा इलाका पर्याय म्हणून वापरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर घडते मात्र निशब्द पणे (वरिष्ठांच्या किंवा भुरट्यां लीडरांच्या दबावात त्यांना शांत बसून नाईलाजाणे पाहत राहावे लागते.) किंवा हेतू पुरस्कर काही अधिकारी टाळूनही नेतात. मात्र काही दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी असले तर या सर्व गोष्टी कारवाईच्या मार्गाने योग्य पद्धतीने हाताळतात. ते क्वचितच पाहायला मिळते.*
*असाच काहीसा विषय...... आपल्या परिसरात पाहायला मिळत आहे. शासनाकडून सुविधा उचलून प्रत्येक गावात खेड्यात घरोघरी सुलभ शौचालय बांधलेली आहेत. आणि वनविभाग जंगलात शेजारी शौचालयात जाण्यास मनाई करते मात्र तरीही लोक त्या गोष्टीला न जुमानता शौचालयास बाहेर गावाजवळ जातात. गोष्ट इथपर्यंत ठीक आहे. मात्र परिसरात घडलेल्या एका घटनेत असे आढळून आले आणि लोकातही चाललेल्या चर्चेनुसार एका 50- 60 वर्षे वयाच्या महिलेला ती शौचालयास गेली आणि वन्य प्राण्याने तिला नेल्याची खोटी माहिती वन विभागाला पुरवण्यात आली. आणि त्यानुसार सर्व कामे सोडून जीवाचा आटापिटा करत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली ,रात्रंदिवस तिच्या शोध घेण्यात आला. मात्र समोर जे दृश्य आले ते वेगळेच होते. ती थोडी मतिमंद असलेली महिला गावापासून दूर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्याकरता बनवलेल्या पाणवट्यावर दुसऱ्या दिवशी आढळून आली. महिला सुरक्षित होती. मात्र भांबवलेली होती वन विभागाने तिला सुखरूप तिच्या घरी पोहोचवले. आणि गाव परिसरात त्या महिलेला जाणून-बुजून जंगल परिसरात नेऊन सोडल्याच्या चर्चेला ऊत आला. खरे तर या घटनेत विभागाने परिवारावर रीतसर वन कायदा नुसार कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांना माहिती मागणी गरजेचे आहे. कारण ती महिला पाण्याच्या टाक्याजवळच शौचालयास तेवढ्या दूर कशी का गेली? याबद्दलही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. मात्र यातही वन विभाग हतबल असल्याचे दिसून येते.*
*तर दुसरी एक घटना..... या मध्ये परिसरातील काही लोक कुड्याचे फुल संकलनाकरिता जंगलात गेले. मात्र जाताना मिळून गेले आणि त्यांच्याच माहितीनुसार येताना एका 60- 65 वर्षाच्या व्यक्तीला ते मागे सोडून आले. नंतर तो घरी परतलाच नाही याबाबत सुद्धा सूचना वनविभागाला देण्यात आली वन विभागाने पुन्हा एकदा जिवाचे रान करीत संपूर्ण यंत्रणा कामाला राबवीत त्या घनदाट जंगलात त्याचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सुद्धा कामाला लागले. आणि एवढेच नाही तर डॉग स्कॉट दोन्ही विभागाने त्याचा शोध घेण्याकरता वापर करण्यात आला. या संपूर्ण शोध मोहिमेमध्ये गावचे, परिसरातील, वन विभाग आणि पोलीस यांचे 100 ते 200 लोक, कर्मचारी तीन दिवसापासून रात्रंदिवस त्याच्या शोधात भटकत आहे. अजूनही कुठली अप्रिय घटना होण्याची शक्यता नकारता येत नाही. मात्र त्याला जरी वन्यजीवाने हमला करून इजा पोहोचवली नसेल तरीही... त्याच्यासोबत गेलेल्या लोकांनी त्याला मागे सोडून आलेच कसे? काही घातपात झाला नसेल ना? किंवा नसेलही झाला तर...एवढा उन्हात बिना पाण्याने तो सुरक्षित असेल का? हा ही प्रश्न निर्माण आहे. आता जर या घटनेत तो वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला मिळाला तर परिवाराला 25 लाख रुपये मिळणारच. मात्र तो जर जिवंतच मिळाला किंवा मिळालाच नाही तर तीन दिवसात लाखो रुपये झालेला खर्च, संपूर्ण महत्त्वाचे कामे सोडून करण्यात येणारा आटापिटा, याची भरपाई कोण देणार ? यातही तो व्यक्ती जंगलात राखीव वनात नियम तोडून गेलेला होता. जर तो जिवंत मिळाला तर त्याच्यावर आणि त्याच्या परिवारावर वनविभाग कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (ज्या पद्धतीने रेल्वे क्रॉसिंग वर अपघात झाला तर रेल्वे नुकसान भरपाई देण्याऐवजी अपघात झालेल्या व्यक्तींवर किंवा वाहनांवर कारवाई करते.) तशी कारवाई वन विभागाकडून होणे अपेक्षित आहे. जेणेकरून वन विभागाचा वापर करताना लोकांना विचार करावा लागेल, आणि वन्यजीवाच्या हमला मारल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होईल.*
*काही दिवसापूर्वी परिसरात एक मोठी हृदय पिळविणारी घटना घडली....परिसरात चार महिलांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कित्येक दा टोकले आणि वापस परतवले सुद्धा होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महिला आत मध्ये गेल्या आणि ज्या ठिकाणी वाघीण शिकार करून आपल्या बछड्यांसोबत बसली होती तेथेच पाऊल ठेवला आणि वाघ दिसतात सैरा वैरा पडू लागल्या वाघाने सहजीकच त्यांच्या प्रवृत्ती प्रमाणे त्या महिलांचा बळी घेतला. यात फक्त वनविभागाचे एक करोड रुपयेच नाही गेले तर... ते तीनही घर पोरके झाले. अशा घटना वन विभागाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतात.*
*असो मात्र आता घरात घुसलेल्या चोरांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यापेक्षा त्यांना ठेचून त्यांच्यावर कारवाई करणे हाच एक उपाय मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता महत्त्वाचा ठरतो.*
✍️यश कायरकर,(9881823083) अध्यक्ष स्वाब नेचर केअर फाऊंडेशन.(वन्यजीव अभ्यासक तथा पत्रकार)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!