वीज पडून एकाचा मृत्यू
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - दिनांक.२८/०६/२०२६ ला सायंकाळी पाचच्या दरम्यान आलेल्या वादळ, पाऊस, विजेच्या कडकडा सहित पावसाने हजेरी लावली असता शेगाव पासून जवळच येत असलेल्या वायगाव ख. येथील घरच्या शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या प्रभाकर किसनराव मन्ने वय 53 यांच्या अंगावर वीज पडून ठार झाल्याची घटना घडलेली आहे.तालुक्यात सायंकाळी 5 वाजता मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना, प्रभाकर किसनराव मन्ने शेत परिसरात शेळ्या चारत असताना त्यांच्या अंगावर आकाशातील वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी पाच च्या सुमारास परिसरात अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. यावेळी मृतक प्रभाकर मन्ने हे गावाजवळ 3 किमी अंतरावर शेळ्या चारत होते सायंकाळी घरी परत येताना त्याच वेळी त्यांच्या अंगावर अचानक वीज पडली.हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शेगाव पोलीस पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली शेगांव पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळ पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला असून, पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शासनाकडून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरीकाकडुन करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!