नशा नको, सरबत घ्या" उपक्रमातून व्यसनमुक्तीचा संदेश

नशा नको, सरबत घ्या" उपक्रमातून व्यसनमुक्तीचा संदेश


चंद्रपूर : मोहरमच्या पूर्वसंध्येला जटपुरा, चंद्रपूर येथे मुस्लिम युवकांनी सरबत वाटप करत सामाजिक संदेश दिला. "नशा नको, सरबत घ्या" या उपक्रमातून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन सप्ताहानिमित्त विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा संघटक इला मेश्राम यांनी मुस्लिम बांधवांसोबत नशामुक्त भारत अभियानाची शपथ घेतली.
यावेळी व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नागरिकांना नशाबंदी विषयक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात व्यसनमुक्ती टीमच्या सुजाता पाटील, शर्वरी फुलकर, संघा कांबळे, मीना गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!