चंद्रपूर जिल्हा संघटकपदी ईला मेश्राम यांची नियुक्ती
चंद्रपूर जिल्हा संघटकपदी ईला मेश्राम यांची नियुक्ती
व्यसनमुक्त चंद्रपूरसाठी कार्य करण्याचा संकल्प
चंद्रपूर : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्रातील 36 जिल्हा संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक नुकतीच सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे पार पडली. या तीन दिवसीय बैठकीत जिल्हा संघटकांना सन 2026-27 साठी मान्यता देण्यात आली तसेच वर्षभरातील व्यसनमुक्ती चळवळीच्या कार्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा संघटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ईला मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. ईला मेश्राम या मागील 15 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून एकल महिला प्रश्न तसेच व्यसनमुक्ती विषयावर सातत्याने काम करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने, विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आणि जनसामान्यांच्या सहभागातून व्यसनमुक्त चंद्रपूर जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
ईला मेश्राम यांच्या निवडीबद्दल आधार व्यसनमुक्ती केंद्राचे विजय रंगारी, सुजाता पाटील, संघा कांबळे, भाविका दुबे, शर्वरी फुलकर आदींनी अभिनंदन केले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान अधिक व्यापक करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!