वानोजा गावकऱ्यांचा माढेळी, वरोरा रास्ता रोको
टिप्पर चालकाच्या हलगर्जी पणामुळे संपूर्ण गावाचा विद्युत पुरवठा खंडित
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील वणोजा या गावातील विद्युत खांबाच्या तारा एका टीप्पर चालकाच्या हलगर्जी पणामुळे तुटल्यामुळे विद्युत तारा दुरुस्ती करून देत नाही तोपर्यंत रास्ता रोको केला.
यावेळी वरोरा, माढेळी मुख्य मार्गावर वाहनांची वाहतूक कोंडी झाली,तसेच संपूर्ण गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे गावातील पाणी पुरवठा सुद्धा खंडित झाला ज्यामुळे चिडलेल्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रस्ता रोखून धरल होता. महावितरण कर्मचारी यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी पोहचून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगितले परंतु जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आम्ही वाहतूक कोंडी सोडणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. त्यांच्या म्हण्यानुसार आता जर वाहतूक सुरळीत केली तर पुढील 3 ते 4 दिवस आम्हाला असेच विना विद्युत पुरवठाचे राहावे लागणार त्या मुळे आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. ज्या मुळे वरोरा माढेळी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असता अखेर वरोरा पोलीस यांनी हस्तक्षेप करून दोन तासानंतर वाहतूक सुरळीत केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!