भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार



आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम

नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न राहता दैदीप्यमान यश संपादन केले आहे,वंश प्रमोद सहारे आणि इशिका निंमगडे या विद्यार्थ्यांनी  मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 95.80 टक्के गुण संपादन केले, द्वितीय कु नुरी हालमा शेख 95.60  टक्के,तृतीय क्रमांक देवांशी संजय जीवतोडे 95 टक्के, ओंकार आझादब्रम्हां नागोशे 94.80 टक्के, तसेच इतरही विद्यार्थ्यांचा  आज आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे  त्यांच्या घरी  जाऊन कुटुंबासमवेत पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले, भाजप  मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी भाजप नेत्या प्रा सौ किरण कापगते, महामंत्री जितेंद्र टिंगुसले,प्रशांत बोबाटे, महिला अध्यक्षा मनीषा गांडलेवार, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ प्राची आक्केवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे, बबन गुंडावार,युवराज चावरे , नितीन गुरुनूले , संदीप मोहबे,हर्ष गांडलेवार,आनंद आक्केवार,प्रशांत केदार,सौ.बिंदुताई जुमडे,सौ.मनिषा राखडे , सौ गीता ताई अंबदुरतीवार ,गणेश चौथाले सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
सत्कार मूर्तीच्या परिवाराने व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!