वनहक्क कायद्याची फलश्रुती : तालुक्यात अकरा ग्रामसभा करत आहेत तेन्दुपता संकलन:
तळोधी ( बा.) बातमीदार:-
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित नियम 2012 च्या कलम 3(१) नुसार वन जमीन धारण करण्याचा हक्क आणि अधिनियमातील ३(१) ग नुसार गौण उत्पादन तेन्दुपत्ता गोळा करणे, त्यांचा वापर करणे किंवा त्यांची व्हिलेवाट लावणे यासाठी मिळालेल्या स्वामित्व हक्क अन्वये तेदुपत्ता संकलन, व्यवस्थापन व विक्री सामुहिक वनहक्क व्यवस्थापण समिती अंतर्गत होत असुन ग्रामसभा, पहर्णी, किरमटी, वासाळा मक्ता, कोदेपार, जनकापुर,सावंगी बडगे, सोनुली खुर्द, देवपायली, येणोली खुर्द, धामणगाव माल, मागरुड इत्यादी ग्रामसभा वन हक्क कायदा अंतर्गत तेन्दूपत्ता संकलन करत असुन गावातील मजुराणा मोठ्या प्रमाणात गावात रोजगार निर्माण झाला आहे.
👉🏿 जल जंगल जमीन याचं व्यवस्थापन ग्रामसभेकडुन होतं आहे. गावांत रोजगार हमी व वन उपज गोळा करण्यामध्ये बारमाही रोजगार उपलब्ध होत आहे.गावातील मजूर स्थलांतरण थांबले असुन गरीबी दारिद्य्र निर्मूलन समाज निर्माण होईल येणाऱ्या पाच वर्षात गावांत शंभर टक्के रोजगार उपलब्ध होईल.
गणेश भुते
ग्रामसभा मार्गदर्शक प्रमुख



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!